अन् त्या शिक्षकाचे डोळे पाणावले...!

अहमदनगर/प्रतिनिधि-( बाळासाहेब गदादे)  गुरुरब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः या संकल्पनेन...




अहमदनगर/प्रतिनिधि-( बाळासाहेब गदादे) 

गुरुरब्रम्हागुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः या संकल्पनेनुसार नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावातील न्यू इंग्लिश स्कूल चिचोंडी पाटील विद्यालयाच्या सन 1999 च्या बॅचने 24 वर्षापूर्वी आपल्याला शिकवायला असलेल्या सर्व आदरणीय गुरुजनांचे पाद्यपूजन केले .

 सर्व शिक्षक वृंद आपल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या पाद्यपूजनाने एकदम भारावून गेले त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले . आपण आज जे विद्यार्थी घडविले मग ते सामाजिक शैक्षणिक राजकीय किंवा इतरत्र प्रत्येक क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या आपल्या सर्व विद्यार्थ्यांचा गुरुजनांना प्रचंड आदर वाटाले किंवा तसं त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागले . सन 1999 च्या बॅचचे विद्यार्थी एकत्र जमण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना संपर्क करून एक व्हाट्सअप ग्रुप तयार करून संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले होते . 

  कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली त्यानुसार त्याकाळात जे शिक्षक रुंद आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी होते त्या सर्व गुरुजनांना आपलं आद्य कर्तव्य समजून पाद्यपूजन करण्याचे ठरले आणि तज्ञनुसार नियोजन करण्यात आले . नियोजन इतकं सुंदर होतं की तो दिवस संपूच नये असं प्रत्येकाला वाटत होतं . सन 1999 च्या बॅचने यावेळी एक आगळावेळा संकल्प आखला , 

   चिचोंडी पाटील गावातील न्यू इंग्लिश स्कूल चिचोंडी पाटील विद्यालयातील एक भव्य जुनी ऐतिहासिक वेस रिपेअर करून तिचे सुशोभीकरण करून त्यावरती छत्रपती शिवाजी महाराज आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचे पुतळे उभारून त्या सभोवताली शुशोभीकरण करून परिसरात लॉन शोभेची झाडे लावून एक आपल्या 1999 च्या बॅच कडून काहीतरी शाळेमध्ये नाविन्य करून सौंदर्य निर्मिती करणे हा उदात्त हेतू ठेवून त्यादिवशी आलेल्या सर्व शिक्षकांसमोर हा प्रस्ताव मांडला स्कूल कमिटीचे चेअरमन आबासाहेब कोकाटे यांनी या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी दिली व उपस्थितांनी सुद्धा या प्रस्तावाचे तोंड भरून कौतुक केले . 

      माजी मुख्याध्यापक चोभे सर यांनी सन 1999 च्या बॅचचे विशेष कौतुक केले . त्यांनी सांगितले की आत्तापर्यंत मी बऱ्याच गेट-टुगेदर ला गेलो होतो परंतु असा आगळा वेगळा गेट-टुगेदर मी प्रथमच पाहिला तुम्ही सर्वांनी केलेले गुरुजनांचे पूजन हे आमच्यासाठी विशेष आणि वेगळे होते . मुलांनो खरोखर आम्ही तुमच्यावर केलेल्या संस्कारातून तुम्ही नक्कीच उतराई होण्याचा हा एक सुंदर प्रयत्न केला आहे आणि तुम्ही त्यासाठी नक्कीच कौतुकास पात्र आहात . तुम्ही केलेल्या या उदात्त कार्याचे नव्या पिढीने सुद्धा नक्कीच अनुकरण केले पाहिजे आणि त्यानिमित्ताने तुम्ही हा एक नव्या पिढीवर सुद्धा संस्कार करत असल्याचे मत व्यक्त केले 

     . माजी मुख्याध्यापक फंड सर यांनी सुद्धा सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच 24-25 वर्षांपूर्वी जे शिक्षक होते ते यानिमित्ताने एकत्र आले आणि आम्हाला त्या सर्वांशी बोलता आले , भेटता आले त्याबद्दल आनंद व्यक्त करत आभार व्यक्त केले . खरंतर गेट-टुगेदर म्हणजे फक्त एकत्र होणे दंगामस्ती करणे एवढेच नसून प्रत्येक जणांमध्ये अनेक प्रकारचा बदल झालेला असतो आणि तो पाहणे त्यांच्याशी आपल्या विचारांची देवाणघेवाण करणे . रेंगाळलेले मैत्रीचे संबंध पुन्हा रिफ्रेश करत तसेच पुन्हा आपल्या बालवयात जाऊन शालेय जीवनाचा त्या एक दिवसात साठी मनसोक्त आनंद घेणे . हा मुख्य उद्देशअसतो . सन 1999 च्या बॅच कडून सर्वात प्रथम राष्ट्रगीत होऊन आपल्या वर्गातील मयत झालेल्या सर्व मित्र-मैत्रिणींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . कार्यक्रम आंबेश्वर कृषीवन अंभोरा येथे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय शेळके व कृष्णा पाचरणे यांनी केले 

     या कार्यक्रमासाठी साठहून अधिक विद्यार्थी आणि 20 हुन अधिक शिक्षक उपस्थित होते . या वेळी उल्हारे सर , रुपनर सर , धुमाळ सर , डी व्ही कोकाटे सर , आबासाहेब कोकाटे सर ,एस वाय कोकाटे सर , अंबादास फिसके सर , एस जी कोकाटे सर , टापरे सर , फंड सर , जंगले सर , धस सर , सरदार सर ,  डोळे सर ,  रेवगडे सर चोभे सर , पवार सर , तोडमल मॅडम जाधव मॅडम फिस्के मॅडम पवार मॅडम टेकाळे मामा चन्ने सर इत्यादी शिक्षकांनी उपस्थिती दर्शवली व आपले मनोगत व्यक्त केले .

     विद्यार्थी मनोगत प्रवीण कोकाटे ,आशाबाई आगलावे, वैशाली घोडके, सुहास धामणे , आसाराम देसाई , वृषाली कोकाटे यांनी शालेय जीवनात घडलेल्या विविध घटनांची सुंदर आठवण करून देत 1999 चा काळ व आजचा काळ या दोन्ही काळातील झालेला शैक्षणिक व इतर बदल काय चांगलं काय वाईट हे दाखवण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमात प्रामुख्याने गुरूजन पाद्यपूजन , गीत - गायन , अंताक्षरी , मनसोक्त पोहणे , लिंबू -चमचा तसेच संगीत खुर्ची आधीसह फनी गेम्स यावेळी घेण्यात आल्या . शेवटी कार्यक्रमाचे आभार मंगेश नालकुल यांनी व्यक्त केले व कार्यक्रम अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला .

COMMENTS

Name

Breaking,47,Entertainment,26,Health,6,India,21,Maharashtra,55,Sport,22,World,16,
ltr
item
इंडियन न्यूज २६ । Indian News 26: अन् त्या शिक्षकाचे डोळे पाणावले...!
अन् त्या शिक्षकाचे डोळे पाणावले...!
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiCvOJiA5WY4Bf2i8jWza6hX60g1X6jMInTbBTl2pSwazX0WQO9VACily_d8EL40R-gax0aqZ3jPS28ZW1YSln-ruW1swidVsSjA77ZmTcJkB7zJC7fiGs9BQWdmKSYHAuEW3SjlhjG8DomwOCbdnvypG_hgtB-tOU506l7gg4lMqSEwU2ThFj6J8BMyg/s320/IMG-20230606-WA0014.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiCvOJiA5WY4Bf2i8jWza6hX60g1X6jMInTbBTl2pSwazX0WQO9VACily_d8EL40R-gax0aqZ3jPS28ZW1YSln-ruW1swidVsSjA77ZmTcJkB7zJC7fiGs9BQWdmKSYHAuEW3SjlhjG8DomwOCbdnvypG_hgtB-tOU506l7gg4lMqSEwU2ThFj6J8BMyg/s72-c/IMG-20230606-WA0014.jpg
इंडियन न्यूज २६ । Indian News 26
https://www.indiannews26.com/2023/06/blog-post_69.html
https://www.indiannews26.com/
https://www.indiannews26.com/
https://www.indiannews26.com/2023/06/blog-post_69.html
true
746187863983441220
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content