मार त्याला सोडु नको म्हणत तलवारीने सपा-सप वार

 नगर तालुक्यात खुनाचा प्रयत्न कलम ३०७ दाखल.... नगर तालुका (प्रतिनिधी) - (शिवा म्हस्के) नगर तालुक्यातील रस्त्यावर शेततळे बांधण्याच्या वादातून...


 नगर तालुक्यात खुनाचा प्रयत्न कलम ३०७ दाखल....

नगर तालुका (प्रतिनिधी) - (शिवा म्हस्के) नगर तालुक्यातील रस्त्यावर शेततळे बांधण्याच्या वादातून २ गटात तलवार, लोखंडी रॉड, लाकडी काठ्या यांच्या साहाय्याने जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही गटातील ७ जण जखमी झाले असून परस्पर विरोधी फिर्यादींवरुन १३ जणांसह व इतर २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर तालुक्यातील अकोळनेर गावच्या शिवारात ही घटना घडली.

अकोळनेर गावच्या शिवारात तळे मळा परिसरात असलेल्या शेतातील रस्त्यावर एका गटाने शेततळे करण्याचे काम सुरू केल्याने त्यावरुन हा वाद झाला व त्या वादाचे पर्यावसान जोरदार हाणामारीत झाले. यावेळी तलवारीसह लोखंडी रॉड व लाकडी काठ्यांचा वापर करण्यात आला. या तुफान हाणामारीत एका गटातील बाळासाहेब शंकर शेळके, आदेश बाळासाहेब शेळके, निलेश नाथा देशमुख, नाथा मुरलीधर देशमुख हे ४ जण तर दुसर्‍या गटातील सीताराम उर्फ बाळासाहेब नारायण गारुडकर, शुभम सीताराम गारुडकर, विनायक सीताराम गारुडकर हे ३ असे ७ जण जखमी झाले आहेत. 


या संदर्भात नगर तालुका पोलिस ठाण्यात पहिली फिर्याद सीताराम उर्फ बाळासाहेब नारायण गारुडकर (वय ६०, रा.तळेमळा, अकोळनेर, ता.नगर) यांनी दिली असून या फिर्यादीवरुन बाळासाहेब शेळके, नाथा देशमुख, निलेश देशमुख, यशवंत देशमुख, रोहिदस देशमुख, कुंडलिक गारुडकर, विठ्ठल गारुडकर, दादा मोटे (सर्व रा. अकोळनेर) व इतर २० ते २५ जण यांच्याविरुद्ध भा.दं.वि.क. ३२६, ३२४, ३२३, १४३, १४७, १४८, ४४७, १४९, शस्त्र अधिनियमचे कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसरी फिर्याद नाथा मुरलीधर देशमुख (वय ६०, रा.अकोळनेर, ता.नगर) यांनी दिली असून या फिर्यादीवरुन आरोपी सीताराम नारायण गारुडकर, शुभम सीताराम गारुडकर, विनायक सीताराम गारुडकर, शकुंतला नारायण गारुडकर (सर्व रा.अकोळनेर, ता.नगर) यांच्याविरुद्ध भा.दं.वि.क. ३०७, ३२४, ३२३, १४३, १४७, १४८, १४९, शस्त्रअधिनियमचे कलम ४/२५ प्रमाणे खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनास्थळी अनेक जण आपल्या आपल्या मोबाईल मध्ये हे फ्री हाणामारी  स्टाईलचा व्हिडिओ काढताना या व्हिडीओ मध्ये दिसत आहे.

 नगर तालुका पोलिस स्टेशनचे साह्यक पोलिस निरीक्षक शशीकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरील गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक रणजित मारग हे करीत आहेत.

COMMENTS

Name

Breaking,47,Entertainment,26,Health,6,India,21,Maharashtra,55,Sport,22,World,16,
ltr
item
इंडियन न्यूज २६ । Indian News 26: मार त्याला सोडु नको म्हणत तलवारीने सपा-सप वार
मार त्याला सोडु नको म्हणत तलवारीने सपा-सप वार
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgEd2EW7r4sOdzLufapmnNu2zt8vdvXoFRjGxiU5semFDaQ2W7YaYEcJs9Q4bFzobFp6x4MNXAXOB3TwFR-r0b3Cp_d_Io-LehPuGT4X29ux3w4VDm1QT9Mak3tSY_DrpPwFKnolGVmja2pjGfbKcwnBtGBYqcxF0Pzd_rSmOorsYyNiBILj7lwg2gCAA/s320/images%20(7).jpeg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgEd2EW7r4sOdzLufapmnNu2zt8vdvXoFRjGxiU5semFDaQ2W7YaYEcJs9Q4bFzobFp6x4MNXAXOB3TwFR-r0b3Cp_d_Io-LehPuGT4X29ux3w4VDm1QT9Mak3tSY_DrpPwFKnolGVmja2pjGfbKcwnBtGBYqcxF0Pzd_rSmOorsYyNiBILj7lwg2gCAA/s72-c/images%20(7).jpeg
इंडियन न्यूज २६ । Indian News 26
https://www.indiannews26.com/2023/06/blog-post_5.html
https://www.indiannews26.com/
https://www.indiannews26.com/
https://www.indiannews26.com/2023/06/blog-post_5.html
true
746187863983441220
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content