नगर-श्रीगोंदा मतदार संघातील चिचोंडी पाटीलकडे राजकीय लक्ष्य...!

  नगर तालुक्यातील राष्ट्रवादीतील गळती थांबणार कधी ? अहमदनगर/प्रतिनिधि(अन्सार शेख)-             नगर तालुका तीन मतदारसंघात विभागला गेला आहे या...

 नगर तालुक्यातील राष्ट्रवादीतील गळती थांबणार कधी ?

अहमदनगर/प्रतिनिधि(अन्सार शेख)-   
         नगर तालुका तीन मतदारसंघात विभागला गेला आहे याच मतदारसंघातील नगर -पारनेर मतदारसंघात राष्ट्रवादीचे वर्चस्व मोठ्या प्रमाणावर दिसून येते,त्याचबरोबर नगर राहुरी मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्राबल्य मोठ्या प्रमाणावर आहे, मात्र नगर श्रीगोंदा मतदारसंघातील राजकीय घडामोडी कधी थांबणार व  राष्ट्रवादी पक्षाला लागलेली गळती कधी थांबणार असा सवाल कार्यकर्त्यांमधून उपस्थित केला जात आहे



  मागील काही महिन्यांपूर्वी नगर तालुक्यातील शिराढोण येथील उपसरपंच दादा दरेकर यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये मोठ्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला दादा दरेकर हे राष्ट्रवादीचे नगर श्रीगोंदा मतदार संघाचे अध्यक्ष राहिले होते
   दादा दरेकर यांनी हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीशी नाते तोडत बि आर ऐस पक्षाची धुरा हातात घेतली. घनश्याम शेलार हे मागील निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडून विधानसभेचे उमेदवार होते शेलार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जात असत.
   घनश्याम आण्णा शेलार यांनी नगर श्रीगोंदा मतदार संघात कार्यकर्त्यांचा एक मोठा वर्ग तयार करून विश्वास मिळवला आहे, श्रीगोंदा मतदारसंघात कार्यरत असणारे माजी आमदार राहुल जगताप यांनीही यापूर्वी आर जे ग्रुप या माध्यमातून चांगला जनसंपर्क तयार केला होता मात्र मागील काही काळात हा जनसंपर्क तुटत चालला असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती, माजी आमदार राहुल जगताप यांनी नगर तालुक्यात पुन्हा सक्रिय होऊन नगर तालुक्यातील पदाधिकारी यांची बैठक घेऊन राष्ट्रवादीत सुरू असलेली गळती थांबवण्याची मागणी राष्ट्रवादीतील कार्यकर्ते करत आहेत.
मागील काही काळात अण्णा व दादा असे कार्यकर्त्यांचे दोन गट राष्ट्रवादी दिसून आले त्यामुळे राष्ट्रवादीला गळती सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली होती ही गळती थांबवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर नेत्यांनी लक्ष घालण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे
    
   







   नगर तालुक्यात चिचोंडी पाटील हे गाव जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे समजले जाते येथील मतदानाचा टक्का मोठा असल्याने सर्वांच्या नजरा चिचोंडी पाटील लागलेले असतात. चिचोंडी पाटील चे विद्यमान सरपंच शरद पवार यांनीही घनश्याम आण्णा शेलार यांच्याबरोबर बी आर एस पक्षांमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत पक्षांची तिरंगी लढत पहावयास मिळू शकते.



चिचोंडी पाटील गावामध्ये नगर तालुका भाजपाचे तालुका अध्यक्ष मनोज कोकाटे हे यापूर्वी सरपंच पदावर विराजमान होते मनोज कोकाटे यांचे चिचोंडी पाटील गावांमध्ये चांगले वर्चस्व असून त्यांनी येणाऱ्या आगामी निवडणुकांच्या तोंडावर चिचोंडी पाटील येथील पदाधिकाऱ्यांची जुळवा -जुळव सुरू केली आहे.
  

COMMENTS

Name

Breaking,47,Entertainment,26,Health,6,India,21,Maharashtra,55,Sport,22,World,16,
ltr
item
इंडियन न्यूज २६ । Indian News 26: नगर-श्रीगोंदा मतदार संघातील चिचोंडी पाटीलकडे राजकीय लक्ष्य...!
नगर-श्रीगोंदा मतदार संघातील चिचोंडी पाटीलकडे राजकीय लक्ष्य...!
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEie610SZTzgqBKm6-hXGnnmF3o76Rsgc4Fi98HPEMC1qVza_dcK24rTbDu-1ZJfZYNd89ApNBnh7qDDBG58QCAP2-Zh6rPRENNhBrDisna1yAxIZ0oJjQyCRcPf_jwEnwBNlg7kPhfwu-LZDZIM0O7-WbVZR-8wR4JqvQyvSHsthmfSVlxWWQXSfxDxPA/s320/Screenshot_20230618-125111_GBWhatsApp.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEie610SZTzgqBKm6-hXGnnmF3o76Rsgc4Fi98HPEMC1qVza_dcK24rTbDu-1ZJfZYNd89ApNBnh7qDDBG58QCAP2-Zh6rPRENNhBrDisna1yAxIZ0oJjQyCRcPf_jwEnwBNlg7kPhfwu-LZDZIM0O7-WbVZR-8wR4JqvQyvSHsthmfSVlxWWQXSfxDxPA/s72-c/Screenshot_20230618-125111_GBWhatsApp.jpg
इंडियन न्यूज २६ । Indian News 26
https://www.indiannews26.com/2023/06/blog-post_18.html
https://www.indiannews26.com/
https://www.indiannews26.com/
https://www.indiannews26.com/2023/06/blog-post_18.html
true
746187863983441220
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content